अण्णा भाऊ साठे पुरस्कार जीवनातील सर्वोत्कृष्ठ : अभिनेत्री तेशवाणी वेताळ

मार्तंडराव बुचूडे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सुपे (नगर): अत्यंत गरिब परिस्थीतीतून माझ्या कुटुंबातील व शिक्षकांच्या पाठबळावर मिळालेला अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोत्कृष्ठ पुरस्कार आहे. या पुढील काळात मला हा पुस्कार सतत प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री तेशवाणी वेताळ हिने केले.

सुपे (नगर): अत्यंत गरिब परिस्थीतीतून माझ्या कुटुंबातील व शिक्षकांच्या पाठबळावर मिळालेला अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोत्कृष्ठ पुरस्कार आहे. या पुढील काळात मला हा पुस्कार सतत प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री तेशवाणी वेताळ हिने केले.

रांजणगाव मशिदी (ता. पारनेर) येथील बालकलाकार अभिनेत्री वेताळ हिला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज गौरव पुरस्कार नुकताच मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे वर्षा ऊसगावकर व संतोष पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ती बोलत होती. यावेळी कलर मराठी वरील ढोलकीच्या तालावर गाण्याच्या प्रथम विजेत्या पलक व मिनाक्षी यांना संकल्पना दिग्दर्शक निमंत्रक संजय पवार यांच्या हस्ते पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त साहित्यिक अण्णा भाऊ साठे समाजसेवी संस्था मुंबई, व महाराष्ट्रातील तमाम हिंदू-मातंग समाजाच्या वतीने वेताळ हिने चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

पुण्यातील निगडी येथील श्री स्वामी विवेकानंद विद्यालयात नववी मध्ये शिक्षण घेत असलेल्या वेताळ हिने चित्रपट क्षेत्रात झेंडा स्वामिमानाचा, पतंग, पॉकेटमनी, न्यायाम, वा पैलवान, बाजार, दाहवी, आयटमगिरी आदि चित्रपटात काम केले आहे. आई मला जगायचय (प्रमुख भुमिका), भ्रमणध्वनी (प्रमुख भुमिका) आदि शॉर्ट फिल्म मध्ये काम केले आहे. तु माझा सांगाती, बे दुणे चार, बोधिवृक्ष या मालिकांमधून आपल्या कलागुणांचा ठसा उमठवला आहे. होळीचे रंग, निरामय हॉस्पिटल, आदी जाहिरातीमध्ये तीने काम केले आहे. काही नाटकामधून यशस्वी भूमिका साकारली आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत साहित्यिक अण्णा भाऊ साठे समाजसेवी संस्थेच्या वतीने तेशवाणी हिला गौरवण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :