भंडारदरा परिसरात पाऊस, वारा आणि धुके...

akole
akole

अकोले : भंडारदरा परिसरात पाऊस, वारा, व धुके असल्याने  वातावरणात मोठा गारवा होता. भंडारदरा धरणात रविवारी सकाळी ६ वाजता ३५३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. जलाशयात सायंकाळी 6 वाजता 3835 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता, तर १२ तासांत भंडारदरा येथे ४७ मिलिमीटर पाऊस झाला असून, जलाशयात पाण्याची आवक ३०५ दशलक्ष घनफूट पाणी आले असून निळवंडे जलाशयात ८७१ दशलक्ष घनफूट पाणी साठा असून वाकी जलाशयातून १५७४ क्युसेक्सने पाणी वाहत असून मुळा ६४४७ क्युसेक्सने वाहत आहे .

शनिवारी झालेला पाऊस तालुक्यातील पश्चिम भागात वादळ व पाऊस असल्याने परिसरातील वीज व दूरध्वनी सेवा पूर्णपणे कोलमडली होती. वीज कर्मचारी यांनी वादळात येऊन वीज तारा जोडल्या. मात्र अकोले दूरध्वनी अधिकारी 'नॉट रिचेबल' होते. त्यामुळे परिसरात गेली दोन दिवसांपासून नेट व मोबाईल सेवा बंद होती.

पाऊस - वाकी ७८/५५६, भंडारदरा ६५/६७५, पांजरे ७७/७४९, रतनवाडी ११७/१११७, घाटघर ८२/१०१४, कोतुळ ९/२११, निळवंडे १३/२०९, आढळा २/८०,

भंडारदरा जलाशयात सकाळी ६ वाजता ३५३० दशलक्ष घनफूट, निळवंडे ७९९ दशलक्ष घनफूट, मुळा ५४१६ दशलक्ष घनफूट, तर आढळा १४७ दशलक्ष घनफूट इतका साठा होता. २४ तासांत भंडारदरा धरणात ३३८ दशलक्ष घनफूट एकूण २३३८ दशलक्ष घनफूट पाणी आले.  कोळटेंम्भा येथील नाणी फॉल, नेकलेस फॉल सुरु झाले असून आज रविवार सुट्टी असल्याने हजरो निसर्गप्रेमी व पर्यटक गर्दी करताना व सेल्फी काढताना दिसत होते.

..आता लावणीची तयारी
आता पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी शेतक-याची लगबग सेकंद काटयापेक्षाही अधिक आहे. लावणीचे बेत सुरू झाले आहेत. हाकारे-कुका-यांची गजबज वाढली आहे. ही लावणी म्हणजे काही फडातला कार्यक्रम नव्हे तर हा मातीतला भुकेचा कार्यक्रम आहे. वर्षभरातील रोजी-रोटीचा प्रश्न सुटावा म्हणून पावसाळी हंगामातील हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम असतो. हे लावणीचे दिवस म्हणजे मातीतली जत्राच असते. मातीबरोबर स्वत:ला सामावून घ्यावे आणि प्रत्येक आव्याबरोबर धान्याच्या राशीची स्वप्ने पाहवीत, असेच जणू..

गेल्या दोन  आठवडय़ांपूर्वी पेरलेला तरवा आता डोलू लागला आहे. या तरव्याची योग्य प्रकारे लावणी व्हावी. या रोपांची योग्यती निगा आणि काळजी घेतली जावी. यासाठी शेतक-याचे नियोजन सुरू झाले आहे. पावसाच्या धारेबरोबर भरडी शेती व पावसाने उसंत घेताच पाणथळ शेतीत रोप लावणी करण्याचे त्याचे मनसुबे आहेत. तयार झालेल्या रोपांची पेंढी बांधावीत. अशा पेंढया चिखल केलेल्या वाफ्यात घेऊन जावे. तेथे पारंपरिक पद्धतीने दोन अथवा तीन काडय़ांचा ‘आवा’ लावावा. आवा म्हणजे दोन अथवा तीन काडय़ांचा एकत्र पुंजका करून लावण्याची पद्धत.. ही कामे काही शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com