गोळ्या झाडणाऱ्या पोलिसांना प्रशिक्षण दिले नाही का? : अण्णा हजारे

अण्णा हजारे
अण्णा हजारे

नगर : "शेवगावमधील शेतकऱ्यांवर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गोळ्या झाडल्या. गुडघ्याच्या खाली गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले नाही काय? शेतकऱ्यांच्या छातीवर छर्रे लागले आहेत, हा दोष आहे. संबंधितांची सखोल चौकशी व्हावी. चर्चेने प्रश्‍न सुटतील, गोळीने चिघळतील, हे सरकारने ध्यानात घ्यावे," असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सकाळशी बोलताना केले.

"शेवगावमधील शेतकऱ्यांवर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गोळ्या झाडल्या. गुडघ्याच्या खाली गोळ्या झाडण्याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले नाही काय? शेतकऱ्यांच्या छातीवर छर्रे लागले आहेत, हा दोष आहे. संबंधितांची सखोल चौकशी व्हावी. चर्चेने प्रश्‍न सुटतील, गोळीने चिघळतील, हे सरकारने ध्यानात घ्यावे," असे ते म्हणाले.

शेवगावमध्ये काल ऊस दरवाढीप्रश्‍नी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात व लाठीहल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाले. त्यांना नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज हजारे यांनी त्यांची विचारपूस केली. नंतर 'सकाळ' कार्यालयास भेट दिली. त्या वेळी बोलताना हजारे यांनी सरकारवर टीका केली.

हजारे म्हणाले, "आंदोलकांना पांगविण्यासाठी अनेक पर्याय होते. ते पोलिसांनी वापरायला पाहिजे होते. गोळीबार करण्याचे कारण नव्हते. तिकडे पाकिस्तानातून हल्ले होतात, तेथे गोळीबाराची गरज आहे. येथे आपल्याच माणसांवर गोळीबार कशासाठी? आंदोलकांवर गोळी चालविताना गुडघ्याच्या खाली गोळी मारायची असते. याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले नाही काय? छातीवर गोळीचे छर्रे लागतातच कसे? याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. संबंधित पोलिसांवर कारवाई होण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.''

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com