पारनेर तालुक्यातील शाळा खोल्यांबाबत अण्णा करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मार्तंडराव बुचूडे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

राळेगणसिद्धी (नगर): पारनेर तालुकयातील सुमारे पस्तीस शाळांमधील विदयार्थी सध्या शाळा खोल्या धोकादायक झाल्याने त्या शाळांमधील मुले झाडाखाली किंवा समाजमंदीरात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. सध्या तालुक्यातील सुमारे १०५ शाळा खोल्या धोकादायक असून, या शाळाखोल्यांसाठी निधी मिळावा यासाठी आपण मुखयमंत्र्यांशी बोलावे असे साकडे पारनेर पंचायत समीतीचे सभापती राहुल झावरे यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना घातले आहे. अण्णा हजारे यांनीसुध्दा याबाबत आपण मुखयमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगीतले.

सभापती झावरे यांनी गेल्या काही दिवसात गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, गटशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, प्राथमिक शाळांचे मुखयाध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताअधिकारी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत तालुकयातील धोकादायक शाळांची माहिती मागविण्यात आली होती. त्या वेळी तालुक्यातील सुमारे 105 शाळा खोल्या धोकदायक असल्याचा अहवाल समोर आला. अशा अती धोकादायक शाळेतील मुले सध्या गावातील समाजमंदीरे व मंदीरे येथे बसवण्याचे आदेश दिले होते. अशा शाळा धोकादायक शाळा खोल्यांच्या जाग्यावर नविन खोल्या बांधणे गरजेचे आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा बांधण्यासाठी जिल्हा परीषदेकडे निधी उपलब्ध नाही.

यावर ऊपाय काय त्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याशिवाय पर्याय नाही, असे सभापती झावरे यांच्या लक्षात आले. त्यांना या बाबतची माहीती राळेगणसिध्दी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली़ व तालुक्यातील धोकादायक शाळा खोल्यांची माहीती दिली. यातील काही प्राथमिक शाला खोल्या सुमारे 70 ते 80 वर्षापुर्वीच्या असल्याचे हजारे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या अतीशय जुनाट व धोकादायक झाल्याचे ही लक्षात आणून दिले. याबाबत मुखयमंत्र्यांशी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्याचे साकडे झावरे यांनी हजारे यांना घातले त्यावेळी हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलतो असे अश्वासन झावरे यांना दिले. या वेळी गटशिक्षणाधिकारी जयश्री कार्ले, उपसरपंच लाभेष औटी, संजय पठाडे, गणेश भासले आदी मान्यवर उपस्थित होते़.