बेलवंडी महावितरण उपविभागात वाणिज्य व घरगुती मीटरमध्ये गफला

संजय आ.काटे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

महावितरणचे असे ठेके घेणारे लोकांची असी फसवणूक करण्याची साखळीच असल्याची शंका आहे. त्यातून ग्रहाकांकडून काही पैसे घेतानाच कंपनीलाही फसविण्याचे उद्योग झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, या ठेकेदारांसोबत कंपनीचे काही लोक सामिल आहेत का, याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

साडेपाच लाखाला कंपनीला ठेकेदारानेच घातला गंडा, गुन्हा दाखल

श्रीगोंदे (नगर): महावितरणच्या बेलवंडी उपविभागातील गावातील वाणिज्य व घरगुती मीटची तपासणी करुन त्यांचे बिले तयार करणाऱ्या ठेकेदार व त्यांच्या आठ कर्मचाऱ्यांनी मोठा गफला केल्याचे समोर आले आहे. ग्राहकांचे जवळपास ४५ हजार मीटर यूनीट कमी दाखवून पाच लाख ४४ हजाराची कंपनीची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल झाली असून, बेलवंडी पोलिसांनी यातील मुख्य ठेकेदाराला अटक केली आहे.

याप्रकरणी महावितरणच्या बेलवंडी उपविभागातील सहाय्यक लेखापाल मीरा वाघमारे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी यातील मुख्य आरोपी ठेकेदार योगेश मॅकाल (वय २७, राहणार श्रमीक नगर सावेडी नगर) याला अटक केली.

याबाबत पोलिस निरीक्षक ललित पांडूळे यांनी सांगितले की, महावितरणने बेलवंडी हद्दीतील बेलवंडीसह कोळगाव, ढवळगाव, मढेवडगाव, पारगावसुद्रीक या गावातील वाणिज्य व घरगुती मीटरचे रिडींग घेण्यासाठी मॅकाल याला ठेका देण्यात आला होता. त्यासाठी त्याच्याकडे आठ कामगार होते. मीटर रिडींगचे काम करणारे कामगार प्रत्यक्षातील मीटर यूनीटपेक्षा कमी यूनीट नोंदवहीत दाखवित होते. यावर्षीच्या पहिल्या दिवसांपासून आजपर्यंत ही फसवणूक झाल्याचा महावितरणने फिर्यादीत दावा केला आहे. काही संशयीत ग्राहकांच्या मीटर व बिलांची महावितरणने पडताळणी केल्यावर गेल्यार्षीच्या तुलनेत मीटर रिडींग व बीलांमध्ये तफावत आढळली. त्यानंतर कंपनीने फिर्याद दाखल केली. ही फसवणूक नेमकी कशापध्दतीने गेली जात होती, याची चौकशी सुरु आहे.'

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news belwandi mahavitaran meter issue