पस्तीस हजारांची लाच घेताना हेडकॉन्स्टेबलला अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

पाथर्डी, (जि. नगर)  - साक्षीदारावर दडपण आणल्याबाबत न्यायालयात सादर करावयाचा अहवाल आरोपीच्या बाजूने लिहिण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू पुंडला आज अटक करण्यात आली. खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यातील साक्षीदारावर आरोपीने दडपण आणल्याची तक्रार आहे. त्याबाबत पोलिसांना अहवाल न्यायालयात सादर करावयाचा होता. आरोपीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी पुंड याला पस्तीस हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा लावला.

पाथर्डी, (जि. नगर)  - साक्षीदारावर दडपण आणल्याबाबत न्यायालयात सादर करावयाचा अहवाल आरोपीच्या बाजूने लिहिण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू पुंडला आज अटक करण्यात आली. खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यातील साक्षीदारावर आरोपीने दडपण आणल्याची तक्रार आहे. त्याबाबत पोलिसांना अहवाल न्यायालयात सादर करावयाचा होता. आरोपीच्या बाजूने अहवाल देण्यासाठी पुंड याला पस्तीस हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा लावला. येथील हॉटेल कानिफनाथमध्ये तक्रारदाराकडून पस्तीस हजार रुपये स्वीकारताना पुंडला अधिकाऱ्यांनी पकडले. गुन्हा दाखल करून पुंडला अटक करण्यात आली. 

टॅग्स