मुख्यमंत्री फडणवीसांच्या साक्षीसाठीचा अर्ज मागे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

नगर - कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांना साक्षीसाठी बोलाविण्याबाबत आरोपीतर्फे दिलेला अर्ज शुक्रवारी ऍड. प्रकाश आहेर यांनी मागे घेतला.

विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांच्या साक्षीसाठी ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी दिलेल्या अर्जावर आज युक्तिवाद झाला. त्याबाबत सोमवारी (ता. 10) निर्णय होणार आहे. कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून खटल्याची सुनावणी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. मागील सुनावणीवेळी आरोपी नितीन भैलुमे याचे वकील ऍड. आहेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एका वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतल्याबद्दल श्रीराम पवार यांची साक्ष नोंदविण्याबाबत अर्ज दिला होता. त्यावर आज युक्‍तिवाद झाला. ऍड. निकम यांच्या विनंतीनुसार ऍड. आहेर यांनी मुख्यमंत्री फडणवीस व श्रीराम पवार यांच्या साक्षी नोंदविण्याबाबतचा अर्ज मागे घेतला.