एटीएम कार्ड पळवून 25 हजार चोरले 

अमोल वाघमारे
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

याबाबत शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 133 / 2017 प्रमाणे भारतीय दंडविधान 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

सावळीविहीर (जि. नगर) : शिर्डी (ता. राहाता) येथे भावाच्या उपचारासाठी आलेल्या व्यक्तीचे एटीएम कार्ड पळवून अज्ञात चोरट्याने 25 हजाराची रक्कम लंपास केल्याचा प्रकार घडला. याबाबत अविनाश मुरलीधर उंबरकर (वय 24, रा. गाडेगाव मोहल्ला मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली.

अविनाश उंबरकर हे आपल्या भावास शिर्डी येथे वैद्यकिय उपचारासाठी घेऊन आले असता यांचे दिनांक 5 नोहेंबर रोजी साईउद्यान परिसरातून पोस्टाचे एटीएम अज्ञात व्यक्तीने चोरून त्यांच्या बचत खात्यातून एटीएमच्या साह्याने 25 हजाराची रक्कम लंपास केली.

याबाबत शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 133 / 2017 प्रमाणे भारतीय दंडविधान 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक बाबासाहेब सातपुते करत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :