मंत्र्याच्या सुरक्षा रक्षकाकडून तरुणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

नगर - जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा सुरक्षा रक्षक पोलिस कर्मचारी गणेश रामदास अकोलकर याच्यावर तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता.

अकोलकर विवाहित आहे. संबंधित तरुणी शिक्षणासाठी नगरला आली होती. गेल्या सहा महिन्यांपासून अकोलकर तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. याबाबत संबंधित तरुणीने पोलिसांकडे तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे तिने पोलिस अधीक्षकांकडे कैफियत मांडली. त्यामुळे तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोलकर सध्या फरारी आहे.