जवखेडे तिहेरी हत्याकांडाच्या पंचनाम्यातील पंचांची उलटतपासणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नगर - जवखेडे (ता. पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांड खटल्याच्या सुनावणीत आज घरझडती व अन्य पंचनाम्यांमध्ये असलेल्या एका पंचाची साक्ष नोंदविण्यात आली. त्यांची उलटतपासणी झाली. त्यात त्यांनी पंचनाम्याचा घटनाक्रम न्यायालयाला सांगितला. घरझडतीत काही आक्षेपार्ह आढळून आले नाही, असे त्यांनी नमूद केले.

या खटल्याची सुनावणी मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश प्रकाश माळी यांच्यासमोर सुरू आहे. कालच्या (ता. 29) सुनावणीत दोन पंचांची साक्ष व उलटतपासणी झाली होती. अन्य तीन जणांची साक्ष व उलटतपासणी उद्या (ता. 31) होणार आहे. खटल्यात सुमारे 130 साक्षीदारांची तपासणी होणार आहे. फिर्यादीच्या वतीने विशेष सरकारी वकील ऍड. उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिले. आरोपीचे वकील ऍड. सुनील मगरे यांनी उलटतपासणी घेतली.