आपल्या हक्कासाठी न्यायालयीन लढा द्याः अण्णा हजारे

सनी सोनावळे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मनोरा उभारण्यासंबधी योग्य भरपाईसाठी शेतकऱ्यांचे हजारे यांना साकडे

टाकळी ढोकेश्वर (नगर): सावरगाव (ता. पारनेर) येथे नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या 756 किलोवॅट क्षमतेच्या वीजेच्या तारांच्या मनोऱ्याचे काम शेतकऱ्यांना नुकसानभरपाई बाबत कोणतेही आश्वासन न देता सुरू आहे. ते शेतकऱ्यांनी बंद पाडले होते, ते काम कंपनीने पोलीस बंदोबस्तात सुरू केले. त्याबाबत येथील शेतकऱ्यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

यावेळी हजारे म्हणाले, 'राष्ट्रउभारणीसाठी सर्वच क्षेत्रात सुधारणा आवश्यक आहेत. मात्र, हे करत असताना शेतकऱ्यांसह इतरांचे नुकसान होऊ नये. आपल्या हक्कासाठी न्यायालयीन लढा द्या, त्याकरीता प्रसंगी तुरुंगात जा. कंपनीनेही शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला पाहीजे.'

यापूर्वी या भागातून तारांच्या दोन टॉवरलाईन गेल्या आहेत. त्यात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या जमिनीतून तीन टॉवरलाइन गेल्यास काय पिकवणार, असा प्रश्न आहे त्यात भरपाई मिळत नाही अशी कैफियत शेतकऱ्यांनी हजारे यांच्यासमोर मांडली. हजारे यांनीही शेतकऱ्यांची मागणी योग्य असून त्याकरिता त्यांनी न्यायालयात जावून आपला हक्क घ्यावा, असा सल्ला दिला. यावेळी शिवाजी भोसले, बाबाजी लांडगे, विठ्ठल चिकणे, भास्कर गोडसे, सुखदेव चिकणे, अंकुश लांडगे, अशोक शेळके, लक्ष्मण शेळके उपस्थित होते.