श्रीगोंदे: खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय मुलीचे अपहरण

संजय आ. काटे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

त्या चिमुरडीची आईचे माहेर उक्कडगाव येथील आहे. तिला मेहकरी (ता. नगर) येथे दिले होते. मात्र पतीचे व तिचे वांरवार भांडणे होत असल्याने वडिलांकडे राहतानाच गावात शेतमजूरी व घरकाम करुन उदर्निर्वाह करते. मंगळवारी ८ ऑगस्टला त्या मातेच्या दोन मुली व एक मुलगा घरी ठेवून ती शेताच्या कामाला गेली. सांयकाळी साडेचार वाजता तीच्या दुसऱ्या मुलीने माहिती आणली की आईचा मामा लहू देवराम पवार हा घरी आला होता. त्याला घरातील शेंडफळ असणाऱ्या पाच वर्षाच्या बहिणेने खाऊ मागितला. तो देण्याच्या बहाण्याने तो तिला त्याच्या मोटारसायकलवर घेवून गेला. 

श्रीगोंदे, (जि. नगर) : घरी खेळत असणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुरडीचे 'त्या'ने गावातून अपहरण केले. त्या मुलीच्या आईचा तो सख्या मामा असल्याने 'तो' तीला घेवून जात असल्याने संशयही आला नाही. मात्र त्या मातेला ज्यावेळी समजले तेव्हा तीची धडधड वाढली, कारण तीचा हा मामा नऊ वर्षाच्या मुलीवर केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातून चौदा वर्षाची शिक्षा भोगून आला होता. शोध घेतला मात्र मुलगी न सापडल्याने शेवटी बेलवंडी पोलिसात फिर्याद दिली. 

त्या चिमुरडीची आईचे माहेर उक्कडगाव येथील आहे. तिला मेहकरी (ता. नगर) येथे दिले होते. मात्र पतीचे व तिचे वांरवार भांडणे होत असल्याने वडिलांकडे राहतानाच गावात शेतमजूरी व घरकाम करुन उदर्निर्वाह करते. मंगळवारी ८ ऑगस्टला त्या मातेच्या दोन मुली व एक मुलगा घरी ठेवून ती शेताच्या कामाला गेली. सांयकाळी साडेचार वाजता तीच्या दुसऱ्या मुलीने माहिती आणली की आईचा मामा लहू देवराम पवार हा घरी आला होता. त्याला घरातील शेंडफळ असणाऱ्या पाच वर्षाच्या बहिणेने खाऊ मागितला. तो देण्याच्या बहाण्याने तो तिला त्याच्या मोटारसायकलवर घेवून गेला. 

त्या मातेच्या मनात शंकाचे काहूर माजले. कारण तिचा हा मामा त्याच्याच गावात बलात्काराच्या गुन्ह्यात चौदा वर्षे तुरुंगात होता. त्याने जलालपुर येथील एका नऊ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला होता. त्या चिमुरडीचा त्या आईने नातेवाईकांच्या मदतीने शोध घेतला मात्र काहीच हाती न लागल्याने गुरुवारी १० ऑगस्टला उशिरा बेलवंडी पोलिसात याबद्दल फिर्याद दिली. 

बेलवंडी पोलिसांना आरोपी लहू पवार याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या सह अपहरण झालेल्या त्या पाच वर्षाच्या कोवळ्या चिमुरडीचा शोध घेण्यासाठी पथके फिरत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :