राळेगणसिद्धी येथे विनामुल्य सर्व रोगनिदान व औषोधोपचार शिबीर

मार्तंडराव बुचुडे
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

राळेगणसिद्धी (नगर): जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृती दिनाचे औचित्यसाधून जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत वैद्यकियसेवा व उपचार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या शिबारीचे आयोजन करण्यात आले आहे.

राळेगणसिद्धी (नगर): जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई हजारे यांच्या स्मृती दिनाचे औचित्यसाधून जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत वैद्यकियसेवा व उपचार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या शिबारीचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीराच्या नियोजनाची पहिली बैठक हजारे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या ऊपस्थीतीत संप्न्न झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एच. पालवे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदिप सांगळे, ऊप विभागिय अधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. एस. चाबुकस्वार, वैध्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संदीप जाधव, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, ऊपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, विजय माळी आदी मान्यवर ऊपस्थीत होते.

बैठकीत शिबीराच्या नियोजना विषयी चर्चा करण्यात आली. शिबीर वैद्यकिय शिक्षण मंत्री महाजन यांच्या पुढाकारातून घेण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी शिबीर आरोग्य विभाग जिल्हा प्रशासन, व राळेगणसिद्धी परीवार यांच्या संयुक्त विध्यामाने आयोजित करण्यात आल्याचेही सांगीतले. यासाठी गरीब व गरजूंना रुग्णसेवा मोफत ऊपलब्ध करूण देण्यासाठी अधिका-यांनी चांगले व सूक्ष्म नियोजन करावे असे हजारे यांनी सांगीतले. तसेच जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांनी जवळच्या रुग्णालयात आपली शिबारीपुर्वीची आरोग्य तपासणी करूण घ्यावी, त्यासाठी या रूग्नालयात 13 ते 18 नोव्हेंबर पर्यंत नांव नोंदणी करूण आरोग्याची पुर्व तपासणी करण्यात येणार आहे. हे शिबीर गरजू रूग्नांसाठी अतीशय महत्वाचे असल्याचेही हजारे यांनी सांगीतले.

या शिबीरात मुंबई, नाशिक व पुणे येथील नामवंत डॉक्टर तपासणी व ऊपचार करणार आहेत. या शिबारीत नेत्र तपासणी, ह्रदयरोग, अस्थी विकार, बालरोग, मुत्राशय विकार, स्त्रीरोग, नाक, कान, घसा, श्वसनविकार, कर्करोग, मेंदू रोग, दंतरोग आदी महत्वाच्या आजारावर मोफत ऊपचार करण्यात येणार आहेत, अशी माहीती संदीप जाधव यांनी दिली. तरी या शिबीराचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा असे, अवाहन राळेगणसिद्धी परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :