कोपर्डी, जवखेडे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या फौजदाराची आत्महत्या 

सूर्यकांत नेटके
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

वाघमारे हे नगर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असताना त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन कोतवाली पोलीस स्टेशन पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी चांगले काम केले होते. कोपर्डी 'निर्भया'कांड, जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचे दोषारोपपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. अत्यन्त कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते परिचित होते

नगर - स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे आज (रविवार) सकाळी उघडकीस आले. नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी भागातील जॉगिंग ट्रॅक जवळील गुलमोहराच्या झाडाला त्यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली.

वाघमारे हे नगर जिल्हा पोलिस दलात कार्यरत असताना त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन कोतवाली पोलीस स्टेशन पारनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी चांगले काम केले होते. कोपर्डी 'निर्भया'कांड, जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचे दोषारोपपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. अत्यन्त कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते परिचित होते.

तोफखाना पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. वाघमारे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे.