मादी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; कोल्हेवाडी शिवारातील घटना

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

ग्रामस्थांमध्ये घबराट 

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी मादी बिबट्या जेरबंद झाला. परिसरात बिबट्यांच्या मुक्त ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

समनापूर व कोल्हेवाडी शिवारात दोन महिन्यापासून बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिबट्यांनी परिसरातील शेळ्या, मेंढया, कुत्रे, वासरे फस्त केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भरदिवसा बिबटे हल्ले करु लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. ता. २८ ऑगस्ट रोजी किशोर कोल्हे यांचा कुत्रा बिबट्याने फस्त केला होता. त्यामुळे परिसरात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वनविभागाकडे कोल्हे यांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने कोल्हे यांच्या शेतात पिंजरा लावला.

बिबट्या पिंजऱ्यात यावा यासाठी त्यात कोंबडया ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी बिबट्याची मादी व तिची पिल्ले शिकारीसाठी आले असता भक्षाच्या नादात पिंजऱ्यात जेरबंद झाले. मादी बिबट्या बघण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. वनविभागाने बिबट्यास निंबाळे येथील नर्सरीत हलविले. परिसरात अजूनही बिबटे असल्याने वनविभागाने पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी माजी उपसरपंच जालिंदर दिघे, विलास कोल्हे, रावसाहेब कोल्हे, संकेत कोल्हे, रामनाथ दिघे व विकास कोल्हे व ग्रामस्थांनी केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'
आणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला 
मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू
पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा 
मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट
कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर
ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती