नगर : मांडओहळ धरण १००% भरले 

मांडओहोळ : पूर्ण क्षमतेने भरलेला प्रकल्प (छायाचित्र: सनी सोनावळे)
मांडओहोळ : पूर्ण क्षमतेने भरलेला प्रकल्प (छायाचित्र: सनी सोनावळे)

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान ठरलेला मांडओहोळ प्रकल्प आज पहाटे पाच वाजता पुर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे टाकळी ढोकेश्वरसह परीसरातील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. अशी माहीती शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी दिली.

धरणामध्ये एकूण ३९९ दशलक्ष घनफूट तर उपयुक्त ३१० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. (ता. २५) आॅगस्ट रोजी या धरणात ३२% साठा होता पंरतु पळसपुर, शिंदेवाडी, काताळवेढा, काळेवाडी, सावरगाव परिसरात दोन दिवसापासून झालेल्या जोरदार पावसामुळे हा प्रकल्प आज १००% भरला आहे. या धरणावरून टाकळी ढोकेश्वरसह कान्हुर पठार सोळा गाव पाणी योजना असून, त्या पाणीटंचाईच्या काळात सुरू करण्यात अडचण येणार नाही. प्रकल्पाखालील खडकवाडी, पळशी, वासुंदे यासंह अन्य गावांना या पाण्याचा शेतीसाठी फायदा होणार आहे.

आठवड्यात झालेल्या पावसाने येथील छोट्या तलावांसह विहिरींनाही पाणी वाढल्याने शेतकरी व गाव गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. पाण्याचा वापर काटकसरीने करा तरच हे पाणी पुढील महिने पुरेल असे सहायक अभियंता शंकर रोहकले यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com