'पाकिटचोर' महिलांची आठवडे बाजारात धुलाई; नगर जिल्ह्यातील तळेगाव दिघे येथील प्रकार

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 13 जुलै 2017

तळेगाव दिघे (जि. नगर) - गुरुवारच्या आठवडी बाजारात आलेल्या नागरिकांचे पाकिटे चोरणाऱ्या दोन महिलांना आज (गुरुवार) सायंकाळी पाचच्या सुमारास नागरिकांनीच पकडले आणि बाजारातील महिलांनी त्यांची यथेच्छ धुलाई केली.

तळेगाव येथे आठवडे बाजारात वारंवार चोरीच्या घटना घडत होत्या. दरम्यान गुरुवारी आठवडे बाजारासाठी धनगरवाडा येथून आलेल्या एका महिलेचे पाकिट चोरताना दोन महिलांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर बाजारातील महिलांनी चोरट्या महिलांची बाजारात लाथा-बुक्‍क्‍यांनी व चपलाने यथेच्छ धुलाई केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या महिलांनी आपण संगमनेर येथील असल्याचे सांगितले. मात्र नावे सांगितली नाहीत. अखेर झंझट नको म्हणून ग्रामस्थांनी त्यांना सोडून दिले. तळेगाव चौफुलीवर येत दोघीही एका रिक्षात बसून संगमनेरच्या दिशेने रवाना झाल्या. मात्र प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नाही. या पाकिटचोर महिलांच्या धुलाईची चर्चा सुरु आहे.