दूध, भाजीपाला नेणाऱ्या वाहनांना पोलिस संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नगर - संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव मिळाल्याशिवाय उद्यापासून (1 जून) सुरू होणारा संप मागे न घेण्याचा निर्धार आज पुणतांबे येथील बैठकीत शेतकऱ्यांनी केला.

नगर - संपूर्ण कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव मिळाल्याशिवाय उद्यापासून (1 जून) सुरू होणारा संप मागे न घेण्याचा निर्धार आज पुणतांबे येथील बैठकीत शेतकऱ्यांनी केला.

उद्यापासून डेअरीला दूध घालू नये, भाजीपाला शहराकडे जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी जिल्हाभर जमावबंदी आदेश लागू केला असून, दूध, भाजीपाला व अन्य जीवनाश्‍यक वस्तू नेणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्यात येणार असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.