नगर-सोलापूर रस्त्यावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी गावकऱ्यांकडून श्रमदान

संजय आ. काटे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

बांधकाम विभाग तरीही शांतच असल्याने घोगरगाव येथील तरुण, ग्रामपंचायत सदस्य व आसपाच्या गावातील लोकांनी एकत्र येत त्या ओढ्यावर पडलेली खड्यांना मुरूम टाकून बुजविण्याचे काम सुरू केले.

श्रीगोंदे (जि. नगर) : तालुक्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. घोगरगाव येथील नगर-सोलापूर रस्त्यावर दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प होत आहे. तेथील ओढ्याच्या पुलावर खड्डे पडले आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी तरीही शांत असल्याने घोगरगाव व आसपासच्या गावातील तरुण श्रमदान करीत रस्त्यावर मुरूम टाकत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी गावकरी झटत आहेत. 

नगर- सोलापूर महामार्गावर घोगरगाव येथे असणारा पूल अरुंद आहे. त्यातच त्या पुलावर कठडे नाहीत. त्यामुळे या पुलावरून एरव्ही वहातुक सावकाश सुरू असते. त्यभागात जोरदार पाऊस झाल्याने ओढ्याला आलेल्या पाण्याने खड्डे वाढले. काल शुक्रवारपासून त्या मार्गावरील वहातुक ठप्प होत आहे. आज सकाळी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्याची माहिती आहे.

बांधकाम विभाग तरीही शांतच असल्याने घोगरगाव येथील तरुण, ग्रामपंचायत सदस्य व आसपाच्या गावातील लोकांनी एकत्र येत त्या ओढ्यावर पडलेली खड्यांना मुरूम टाकून बुजविण्याचे काम सुरू केले.

Web Title: Nagar news Nagar-Solapur road