नेवासे-पोलिसांच्या छाप्यात वीस लाखांची गोवंश कातडी जप्त

सुनील गर्जे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

पोलिस उपाधीक्षक अभिजित शिवतारे यांची कारवाई, तिघांना अटक, सहा फरार

नेवासे (नगर): शेवगाव उपविभागीय पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाने सलाबतपुर (ता. नेवासे) येथे टाकलेल्या छाप्यात २० लाख रुपये किमतीचे कत्तल केलेल्या जनावरांचे (गोवंश) दोन हजार कातडी जप्त करण्यात आली असून, कातडी तस्करी करणार्‍या तिघांना अटक केली. मात्र, व्यवहारातील दलाल पोलिसांना पहाताच पसार झाला. याप्रकरणी नेवासे पोलिसात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपाधीक्षक अभिजित शिवतारे यांची कारवाई, तिघांना अटक, सहा फरार

नेवासे (नगर): शेवगाव उपविभागीय पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाने सलाबतपुर (ता. नेवासे) येथे टाकलेल्या छाप्यात २० लाख रुपये किमतीचे कत्तल केलेल्या जनावरांचे (गोवंश) दोन हजार कातडी जप्त करण्यात आली असून, कातडी तस्करी करणार्‍या तिघांना अटक केली. मात्र, व्यवहारातील दलाल पोलिसांना पहाताच पसार झाला. याप्रकरणी नेवासे पोलिसात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहिती वरुन शेवगाव उपविभागीय पोलिस उपाधीक्षक अभिजित शिवतारे व परीविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक सोनाली कदम यांच्या पथकाने गुरुवारी (ता. ३१) रात्री सलाबतपुर (ता. नेवासे) येथे गोवंशच्या कातड्याची खरेदी-विक्री होणार असतांनाच टाकलेल्या छाप्यात विनापरवाना २० लाख रुपये किमतीचे कत्तल केलेल्या जनावरांचे (गोवंश) दोन हजार कातडी मिळून आली. पोलिसांनी कातडी ताब्यात घेवून तस्करी करणारे बनू कालिम शेख, आजम मन्नू शेख, तोहफिक रहीम बक्ष (सर्व रा. सलाबातपुर) या तिघांना अटक केली. मात्र, दलाल बाबू सय्यद पोलिसांना पहाताच अंधाराचा फायदा घेवून पसार झाला.  

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अंकुश पोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेवासे पोलिसांत आरोपी बाबू निसार सय्यद, राजू निसार सय्यद, बनू कालिम शेख, आजम मन्नू शेख, तोहफिक रहीम बक्ष, अवेश कालिंदर शेख, कालिंदर रशीद शेख, अजर रशीद शेख, भैय्या चाँद शेख (सर्व रा. सलाबातपुर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासे तालुक्यातील सलाबतपुर व चांदे हे दोन गावे जनावरांच्या (गोवंश) कत्तली, मांस विक्री व कातडी खरेदी-विक्रीची केंद्र म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहेत. शासनाच्या गोवंश बंदी नंतर चांदे येथील कत्तलखाने सध्यातरी बंद दिसतात. मात्र, सलाबतपुर येथून आजही चोरट्या पद्धतीने अनेक ठिकाणी गोवंश मास विक्रीसाठी पुरवठा केला जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते. याठिकाणी चोरीच्या जनावरांची ही खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांकडून समजते.  

दरम्यान, नेवासे तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील बहुतांशी गावांतून गेल्या वर्षभरात शेतकर्‍यांचे अनेक जनावरे (गोवंश) चोरीस गेलेले आहेत. चोरी गेलेल्या जनावरात गायी व बैलांचे प्रमाण अधिक आहे. आज पर्यंत जनावरे चोरीच्या कोणत्याच गुन्ह्याचा तपास लागला नाही. तर अनेक शेतकरी कागदपत्रांच्या झंजटीमुळे पोलिसात जात नाही. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्याचाही छडा लावण्यासाठी पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली पाहिजे. यातून निश्चितच जनावरे चोरणार्‍या टोळीबरोबरच कातडे खरेदी-विक्री करणारे तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस येईल.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

टॅग्स