नगरमध्ये मंडळांनी दिला 'डीजे' व गुलालाला फाटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

नगर - जिल्ह्यात दोन हजारांवर मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. जिल्ह्यातील बहुतांश मंडळांनी या वर्षी "डीजे'सह गुलालाला फाटा देऊन मिरवणुकीत एक आदर्श निर्माण केला. नगर शहरात जवळपास तेरा तास मिरवणूक चालली.

नगर शहरात तालयोगी प्रतिष्ठानने घरगुती गणपतींसाठी अनंतदर्शन रथ ठेवला होता. लार्सन अँड टुब्रो कंपनीने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विरघळतील अशी विसर्जनाची व्यवस्था केली होती. कोची (ता. संगमनेर) येथील मंडळाने मिरवणुकीला फाटा देऊन त्या खर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजविले. सुपे (ता. पारनेर), वाळकी (ता. नगर) येथे डीजे व गुलालाला फाटा देण्यात आला. कोपरगाव येथेही डीजेमुक्त मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी ढोल, झांज पथकासह सनई, चौघडा अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला.