‘त्या’ सर्वांना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नगर - पटेल, जाट, मराठा, लिंगायत, ब्राह्मण आदी समाजांना जातीच्या नव्हे, तर आर्थिक निकषांवर स्वतंत्र २५ टक्‍के आरक्षण द्यावे, असे मत केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्‍त केले.

आठवले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय कामांचा आढावा घेतला, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आठवले म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आरक्षण देऊ नये असे सांगितले असले, तरी संसद ठराव करून कायदा करू शकते. धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही. मुस्लिमांनाही यात वेगळे आर्थिक निकष लावून आरक्षण द्यायला हवे.’’

‘ॲट्रॉसिटी’च्या आधारावर खोटे गुन्हे दाखल होतात असे वाटत नाही. तसे होत असतील तर स्थानिक नेते जबाबदार आहेत, असे आठवले म्हणाले. भाजप दलितविरोधी पक्ष असल्याचा प्रचार काँग्रेसकडून नेहमी होतो; मात्र काँग्रेसच जातीयवादी पक्ष आहे, असा आरोप करून आठवले म्हणाले, ‘‘भाजप आता पूर्वीसारखा जनसंघाचा पक्ष राहिलेला नाही, तर तो जनसामान्यांचा पक्ष झाला आहे.’’

‘शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करा’ 
राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, ही अभिनंदनाची गोष्ट आहे; मात्र कर्जमाफीबरोबरच शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करायला हवे. त्यासाठी शेतमालाला हमीभाव मिळवून देण्याचे प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली.