त्या नराधमाने भाचीच्या पाचवर्षीय चिमुकलीवर केला बलात्कार

संजय आ. काटे
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथून सख्ख्या बहिणीची पाच वर्षांची चिमुकलीचे आरोपी लहू देवराम पवार (वय ४५, राहणार जलालपूर ता.कर्जत) याने ८ ऑगस्टला खाऊचे आमिष दाखवून अपहरण केले. त्या मुलीच्या आईने १० ऑगस्टला बेलवंडी पोलिसात फिर्याद दिली. शेतमजुरी करणारी ती आई कोलमडली होती. कारण हा तीचा हा मामा नऊ वर्षाच्या मुलीवर केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातून चौदा वर्षाची शिक्षा भोगून गेल्या वर्षीच घरी परतला होता. 

श्रीगोंदे, (जिल्हा नगर) : क्रूरकर्मा नराधमाने पाच वर्षांचा कोवळ्या जीवाच्या शरीराची विटंबना केली. एकदा नव्हे अनेकदा तिच्यावर बलात्कार करीत वासनेची भूक भागविली. नात्याची तर नाहीच पण त्या कोवळ्या जीवाचीही पर्वा त्या नराधमाने केली नाही. या वासनाधुंद नराधमाला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने त्या पाच वर्षीय मुलीवर केलेले अत्याचार सांगितल्यानंतर पोलिसही अंतर्मुख झाले.

श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथून सख्ख्या बहिणीची पाच वर्षांची चिमुकलीचे आरोपी लहू देवराम पवार (वय ४५, राहणार जलालपूर ता.कर्जत) याने ८ ऑगस्टला खाऊचे आमिष दाखवून अपहरण केले. त्या मुलीच्या आईने १० ऑगस्टला बेलवंडी पोलिसात फिर्याद दिली. शेतमजुरी करणारी ती आई कोलमडली होती. कारण हा तीचा हा मामा नऊ वर्षाच्या मुलीवर केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातून चौदा वर्षाची शिक्षा भोगून गेल्या वर्षीच घरी परतला होता. 

बेलवंडी पोलिसांनी आरोपी लहू पवार याला राहू पिंपळगाव तालुका दौंड येथून त्या चिमुकलीसह ताब्यात घेतले. त्या मुलीची अवस्था पाहून पोलिसांना सगळेच लक्षात आले होते. तो चिमुकला जीव फक्त जिवंत होता. उठताही येत नव्हते आणि चालताही येत नव्हते. पोलिसांनी खाण्यास दिलेली बिस्किटे तशीच हातात होती. 

पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे व निरीक्षक ललित पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश हिवरकर, पोलीस कॉन्स्टेबल मधुकर सुरवसे, राहुल मोढवे, संभाजी शिंदे व क्षीरसागर यांच्या पथकाने आरोपी पवार याला सोमवारी अटक केल्यावर त्याच्याकडून त्या चिमुकल्या जीवावर केलेला अत्याचार ऐकल्यावर सगळेच सुन्न झाले. ती मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहे.