दुचाकी अपघातात 'चिमुकली' जागीच ठार; आई-वडील गंभीर जखमी

हरिभाऊ दिघे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

संगमनेर तालुक्यातील घटना 

तळेगाव दिघे, (जि. नगर) : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी घसरून पडल्याने एका पाच वर्षे वयाची चिमुकली जागीच ठार झाली, तर तिचे आई-वडील दोघेही जखमी झाले. गौरी साईनाथ धुमाळ असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास आंनदवाडी (ता. संगमनेर जि. नगर) शिवारात ही घटना घडली.

साईनाथ सखाराम धुमाळ ( वय ३३) व पूनम साईनाथ धुमाळ (वय २६ रा. धुमाळवाडी ता. अकोले) हे दांपत्य त्यांच्या दोन मुलींना समवेत घेऊन पुण्याहून संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून प्रवास करीत होते.

दरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकी घसरून पडल्याने मुलगी गौरी धुमाळ ( वय ५) ही जागीच ठार झाली, तर दोघे पती - पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
आता देताय की जाताय; मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ
जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
नोटबंदीने देशाची फसवणूक केली : पी. चिदंबरम
राजनाथसिंह काश्‍मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा
'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना
स्पर्धा परीक्षांच्या पलीकडं... (संदीप वासलेकर)
मौजा चिंधीमालच्या भिकाऱ्यांचं काय करायचं ? (उत्तम कांबळे)