दोन मुलांना मारून आत्महत्या केलेल्या पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा

हरिभाऊ दिघे 
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

पोखरीबाळेश्वर येथील तिहेरी हत्याकांड; एकाच चितेवर केले तिघांवर अंत्यसंस्कार 

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पोखरीबाळेश्वर येथे बुधवारी रात्रीच्यावेळी राहत्या घरात दोन मुलांची गळा दाबून हत्या करीत पित्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. स्वतःच्या दोन मुलांच्या हत्येप्रकरणी आत्महत्या केलेल्या पित्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपी पिता अशोक संतू फटांगरे ( वय ३५ ) याने मुलगा प्रफुल्ल फटांगरे ( वय ७ ), मुलगी अस्मिता फटांगरे ( वय ११ ) यांची बुधवारी रात्रीच्यावेळी गळा दाबून हत्या केली. त्यानंतर अशोक फटांगरे याने राहत्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. अशोक फटांगरे यांची पत्नी माहेरी गेलेली असल्याने बचावली. या तिहेरी हत्याकांडाच्या घटने प्रकरणी मयत मुलांचे आजोबा संतू देवजी फटांगरे यांनी या प्रकारास कारणीभूत आत्महत्या केलेला मुलगा अशोक फटांगरे याच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार मयत आरोपी अशोक फटांगरे विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निघोट या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

एकाच चितेवर अंत्यसंस्कार...
गळा दाबून हत्या करण्यात आलेला मुलगा प्रफुल्ल फटांगरे व मुलगी अस्मिता फटांगरे व आत्महत्या केलेला पिता अशोक फटांगरे या तिघांवर पोखरीबाळेश्वर येथे गुरुवारी सायंकाळी एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्वतःचे कुंकू पुसलेल्या मातेने मुलांच्या विरहाने हंबरडा फोडल्याने उपस्थितांचे हृद्य हेलावून गेले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’