नगरः पाण्याअभावी गणेश विसर्जन करायचं कुठ ?

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

तळेगाव भागातील स्थिती; दुष्काळी स्थितीचे संकट

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात विघ्नहर्ता श्रीगणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. तथापि, पाण्याअभावी गणेश विसर्जन करायचं कुठ? असा प्रश्न यंदाही दुष्काळी भागातील गणेश भक्तांना पडला आहे. दुष्काळ व पाणी टंचाईचा फटका यंदाही विघ्नहर्ता श्रीगणेशाला बसणार असल्याचे दिसून येत आहे.

श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापणे बरोबरच विसर्जनाचा विचार करावा लागतो. अवर्षणप्रवण तळेगाव परिसरात यंदाही पावसाने दडी मारली. परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने कुठेही पाणीसाठे झाले नाहीत. पाझर तलाव, बंधारे, विहिरीही कोरड्याठाक आहेत. त्यामुळे गणेशाच्या स्थापना केलेल्या भक्तांना विसर्जनाची चिंता लागली आहे. अनेकदा पाण्याअभावी मूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण होतो. कमी पाणी साठ्यात मूर्ती विसर्जन केल्यास विटंबनेचे प्रकार घडतात. त्यामुळे गणेश मंडळाना विसर्जनाचा प्रश्न सतावतो आहे. दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तळेगाव परिसरात गणेश विसर्जनाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर