संगमनेर : गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे जनावरांच्या गोठ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेत एका युवकाने आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविली. बाबासाहेब राजेंद्र दिघे ( वय २३ ) असे त्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोल्हेवाडी येथील बाबासाहेब राजेंद्र दिघे या युवकाचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत जनावरांच्या गोठ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी सकाळी सातच्या सुमारास कुटुंबियांना आढळून आला. त्यांनतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविला. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत बाबासाहेब चंद्रभान दिघे यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजि. क्रमांक ८८ / २०१७ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण औटी अधिक तपास करीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nagar news sangamner youth hangs himself