उपग्रह नकाशे वापरून होणार जलयुक्त शिवारची कामे

मार्तंडराव बुचुडे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

हजारे म्हणाले, तंत्रशुद्ध पाणलोट विकास हाच खरा जलयुक्त शिवार योजनेचा पाया आहे. सिमेंट बंधारे खर्चीक आहेत 20 लाख रूपये खर्चाचा सिमेंट बंधारा जर गॅबियन बंधरा  केला तर तो अवघा दोन ते तीन लाखात होतो.

राळेगणसिद्धी  : जलयुक्त शिवार योजनेत समावेश असणाऱ्या राज्यातील सुमारे पाच हजार गावांचे नकाशे उपग्रहाद्वारे तयार केले असून, त्यामुळे जलयुक्तची कमे करणे सोपे झाले आहे. या पुढील कळात सिमेंट बंधाऱ्याऐवजी गॅबियन बंधारे बांधण्यात येतील, अशी माहिती राज्याचे जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डौले यांनी दिली.

डौले यांनी आज सायंकाळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी येथील गॅबियन बंधाऱ्यांचीही पाहणी हजारे यांच्या समावेत केली.  त्यांच्या समावेत मृदुसंधारणचे सचिव कैलास मोते,जिल्ह अधिक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, ऊपसरपंच लाभेश औटी आदी मान्यवर होते.

डौले पुढे म्हणाले, ऊपग्रहाद्वारे तयार केलेल नकशे त्या त्या गावांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कोठे कोणत्या प्रकारचे जलसंधारणाचे काम करावयाचे याची माहीती सहज ऊपलब्ध होते. व  तंत्रशुद्ध पद्धीतने जलसंधारणाची कामे करता येतात. कच्चा खडक असेल तर बंधारे, ऊतार असेल तर खोल सलग समतलचर व जास्त ऊतार असेल तर वनिकरण करण्याची माहीत या नकाशांमुळेच मिळते त्यामुळे ही कामे करणे सोपे झाले आहे. तसेच अनेक वर्षांपूर्वी तुम्ही केलेल्या गँबियन बंधाऱ्याचीच कल्पना सध्या जलयुक्त शिवार योजणेत राबवली जात आहे. यावर्षी सुमारे 240 गॅबियन बंधारे जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात आले आहेत यापुढेही त्यावर जोर दिला जाईल असेही ते म्हणाले.

या वेळी हजारे म्हणाले, तंत्रशुद्ध पाणलोट विकास हाच खरा जलयुक्त शिवार योजनेचा पाया आहे. सिमेंट बंधारे खर्चीक आहेत 20 लाख रूपये खर्चाचा सिमेंट बंधारा जर गॅबियन बंधरा केला तर तो अवघा दोन ते तीन लाखात होतो. शिवाय फायदा दोन्हींचाही समान आहे. त्यासाठी गॅबियन बंधारेच प्राधान्याने करावेत  असा अग्रह हजारे यांनी या वेळी डौले यांच्या कडे केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :