आरोपींना मारहाण न करता पोलिसांनी तपास करावा

आरोपींना मारहाण न करता पोलिसांनी तपास करावा

नगर - सांगली येथील आरोपीच्या खुनाचा प्रकार, म्हणजे पोलिसांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन केलेले कृत्य आहे. असा प्रकार राज्यात पुन्हा होऊ नये, यासाठी रविवारी (ता.26) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.

आरोपींना मारहाण न करता तपास करण्याची लेखी सूचना दिली आहे, अशी माहिती पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांनी बुधवारी दिली.
पोलिस महासंचालक माथूर यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'सांगलीतील घटना वाईट आहे. पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करून वाईट काम केले. त्याची त्यांना शिक्षा मिळेल. मात्र, असा प्रकार पुन्हा होऊ नये, याची दक्षता घेतली जाईल. कोणत्याही आरोपीला मारहाण न करता गुन्ह्याचा तपास व्हावा, अशी सूचना केली आहे. मात्र, मारहाण झाल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल. पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.''

नगरचा उपक्रम राज्यात राबवू
गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातील मुलांना नोकरी, रोजगार मिळावा, यासाठी पोलिस प्रशासनातर्फे रोजगार मेळावा घेतला जात आहे. हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक आहे. नगरचा हा उपक्रम राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे माथूर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com