जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून

अरुण गव्हाणे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील फकीरा लहू रणधीर ( वय ७० वर्षे ) यांना त्यांच्या दोन मुलांनी काठीने मारहाण करून गळा आवळून जीवे ठार मारले. शेत जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आला. वडील मुलींना शेती देणार म्हणून मुलांनीच पित्यास ठार मारले.

पोहेगाव ( जि. नगर ) : मुलींना शेती देणार म्हणून स्वताच्या मुलांनीच पित्याचा निघृण खून केल्याची घटना कोपरगाव ( जि. नगर ) तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे घडली आहे. शुक्रवारी रात्रीच हा खून करण्यात आल्याचा अंदाज असून शनिवारी सकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. फकीरा लहू रणधीर ( वय ७० वर्षे ) असे खून झालेल्या अभागी पित्याचे नाव आहे.

शिर्डी पोलीसांनी दिलेली माहिती अशी :  कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील फकीरा लहू रणधीर ( वय ७० वर्षे ) यांना त्यांच्या दोन मुलांनी काठीने मारहाण करून गळा आवळून जीवे ठार मारले. शेत जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आला. वडील मुलींना शेती देणार म्हणून मुलांनीच पित्यास ठार मारले. आरोपी मधुकर फकीरा रणधीर व विकास फकीरा रणधीर यांना दोघा मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. पंचनामा करून मृतदेह लोणी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मयत फकिरा रणधीर यांच्या मुलींनी फिर्याद दिली. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. 

उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पाटील, पोलिस उपनिरीक्षक श्री. मुलगीर अधिक तपास करीत आहे.