नगरः विहिरीचा कठडा खचल्याने विद्यार्थीनीचा पाण्यात पडून मृत्यू

राजेंद्र सावंत
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पाथर्डी (नगर): विहरीवर धुणे धुत असताना विहिरीचा कठडा खचल्याने ऋृतुजा विष्णु हिंगे (वय 16 वर्षे) ही विद्यार्थ्यीनी विहरीत पडून मृत्यु पावली. मुंगुसवाडे गावात आज (बुधवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पाथर्डी (नगर): विहरीवर धुणे धुत असताना विहिरीचा कठडा खचल्याने ऋृतुजा विष्णु हिंगे (वय 16 वर्षे) ही विद्यार्थ्यीनी विहरीत पडून मृत्यु पावली. मुंगुसवाडे गावात आज (बुधवार) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

विहरीतील पाणी उपसण्यास वेळ लागल्यामुळे सुमारे चार तासानंतर मृतदेह विहरीतुन बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील मुंगूसवाडे येथील ऋतुजा विष्णु हिंगे (वय १६ वर्षे) ही दहावीची विद्यार्थिनी बुधवारी सकाळी ८ वाजता विहीरीवर धुणे धुण्यासाठी गेली. ऋतुजा विहरीतुन पाणी शेंदताना विहीरीचा कठाडा खचला. विहरीचे बांधकाम दगडी चि-यामधे केलेले होते. कठाडयाच्या दगडी चि-यासोबत ऋतुजाही विहिरीच्या तळाशी गेली. विहरीवरुन धुणे धुवुन जाणा-या महिलेला गडगड असा आवाज आला व ती ओरडली. ग्रामस्थही धावले. मात्र, विहीरीला भरपूर पाणी असल्याने मदतकार्य करण्यास अडचण येत होती. ऋतुजाचा मृतदेह विहिरीच्या तळाला अडकला होता. पाणी उपसण्यासाठी एक इंजीन व दोन विजपंप जनरेटरच्या साह्याने चालू केले. पाणी कमी झाल्यानंतर पोकलेन यंत्राच्या साह्याने विहिरीतील पडलेले दगड काढण्याचे काम तब्बल तीन तास चालू होते. चार तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात गामस्थांना यश आले.

घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले गेले. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. सरपंच राजेंद्र हिंगे, उपसरपंच आबासाहेब खेडकर, रमेश हिंगे, जगन्नाथ गुळवे आदीं सह मुंगूसवाडे ग्रामस्थांनी घटनास्थळी मदत कार्य केले. सहाय्यक फौजदार रेवन्नाथ रांजने यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :