टाकळी ढोकेश्वर प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार

सनी सोनावळे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर, जि. नगर): येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस शिवशंभो प्रतिष्ठान व आष्टी तालुका मित्र मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय शिवशंभो रत्न आदर्श उपक्रमशील शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यापूर्वी या शाळेला ग्रामीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन शाळा व्यवस्थापन समितिने गेल्या वर्षभरात आम्ही टाकळीकर ग्रुप, ग्रामपंचायत यांच्या सहकार्यने शाळेचा कायापालट करुण समाजापुढे एक नविन आदर्श निर्माण केला आहे.

डॉ. सुनिल खेडकर (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती)-
शाळेला मिळालेला पुरस्कार हा  भूषणावह असून यात आम्ही टाकळीकर ग्रुप, ग्रामपंचायत,शिक्षक यांचे सहकार्य लाभले यापुढील काळात शाळेची विकासात्मक घोडदौड अशीच राहील.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :