मुलांच्या भांडणावरून युवकाचा खून; घुलेवाडी येथील घटना

मुलांच्या भांडणावरून युवकाचा खून; घुलेवाडी येथील घटना

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे लहान मुलीच्या भांडणावरून एका युवकाचा खून करण्यात आला. किरण कचरू कदम (वय ३०) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पती - पत्नी विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 घुलेवाडी येथील साठेनगर परिसरात लहान मुलीच्या भांडणावरून किरण कदम व भारत शिंदे यांच्या कुटुंबीयात वाद झाला. आरोपी भारत शिंदे याने किरण कदम याच्या गुप्तांगावर जबर मारहाण केली. त्यानंतर किरण कदम यास घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच किरण कदम याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी भारत शिंदे दांपत्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सी. आर. रजपूत करीत आहे. खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com