श्रीगोंदे: पुलावरून टेम्पो पडला नदीत; प्रवासी पोहून बाहेर

संजय आ. काटे
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

नदीला पूर असल्याने पुलावरून पाणी वाहत असतानाही टेम्पो चालकाने पुलावरून जाण्याचे धाडस केले. त्यातच टेम्पो पुलावरून पाण्याच्या प्रवाहामुळे बाजूला जाऊन पुलाच्या कडेला नदीत गेला.

श्रीगोंदे (जि. नगर) : तालुक्यातील शेडगाव-पेडगाव रस्त्यावरील सरस्वती नदीवरुन काष्टीकडे जाणारा पिक-अप टेम्पो पाण्याच्या वेगामुळे पुलावरून काही अंतर वाहुन गेला. टेम्पो मध्ये असणारे दहा प्रवाशी पोहून बाहेर निघाले. ही घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले. 

नदीला पूर असल्याने पुलावरून पाणी वाहत असतानाही टेम्पो चालकाने पुलावरून जाण्याचे धाडस केले. त्यातच टेम्पो पुलावरून पाण्याच्या प्रवाहामुळे बाजूला जाऊन पुलाच्या कडेला नदीत गेला. त्यातून प्रवास करणाऱ्या सुमारे दहा जण पोहून बाहेर येण्यात यशस्वी झाल्याने वाचले.