उज्ज्वल निकम यांच्या साक्षीसाठीचा अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नगर - कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम व अन्य पाच जणांना साक्षीदार करण्याबाबत आरोपीच्या वकिलांनी केलेला अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळला.

नगर - कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम व अन्य पाच जणांना साक्षीदार करण्याबाबत आरोपीच्या वकिलांनी केलेला अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळला.

विशेष सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी निकम व अन्य पाच जणांचा साक्षीदार म्हणून समावेश करावा, असा अर्ज न्यायालयात केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने खोपडे यांचा अर्ज फेटाळून लावला.

"जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करणार आहोत,' असे ऍड. खोपडे यांनी सांगितले. त्यासाठी न्यायालयाने खोपडे यांना 24 जुलैपर्यंत मुदत दिली. खंडपीठात दाखल करणार असलेल्या अपिलाच्या स्थितीबाबत 24 जुलै रोजी म्हणणे मांडण्यास न्यायालयाने बजावले आहे.