Parner
Parner

जलसंधारणाच्या कामांमुळे किन्ही गावाच्या पाणी पातळीत वाढ

टाकळी ढोकेश्वर : किन्ही (ता.पारनेर) येथे  उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व शेतीसाठी तर पाण्याचा विषयच नाही अशी कायमची परिस्थिती या गावाची ही सिथ्ती  बदलण्याचा निर्धार गावातील ग्रामस्थांनी घेऊन गावामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे कामे केली त्याचा परिणाम आज दिसत असुन गावाची पाण्याची पातळी वाढुन कुपनलिकेतुन अपोआप पाणी वर येत आहे.

गावातील उद्योजक नानाभाऊ खोडदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सुशिक्षित वर्गाने यासाठी पुढाकार घेत पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मागील वर्षीपासुन लोकसहभाग, विविध संस्था,सरकारी विभाग यांच्या सहकार्याने यंदाच्या पावसाळ्याच्या अगोदर जलसंधारणाचे कामे केली यामध्ये परिसरातील पाच बंधारे,पाच केटी वेअर ढाकरे, खटकळी या तलावांचे खोलीकरण मजबुतीकरण,गावच्या गायरानात १२ हेक्टर क्षेत्रावर सी.सी.टी.चर खोदण्यात आले माती वाहुन जावू नये म्हणून डोंगर उतारावर १० अनगड दगडी बांधण्यात आले बायफ व एकात्मिक पाणलोट विकास योजनेतून ८०० हेक्टर क्षेत्रावर बांध बंदिस्ती करण्यात आली याकरीता कृषी विभाग,आत्मा,वनविभाग सामाजिक वनीकरण यांचेकडून मदत मिळाली.

चांगला पाऊस झाल्याने परिसरातील तलाव,बंधारे, विहीरीतही तुडुंब पाणी आले बोअरवेल मधून आपोआप पाणी येऊ लागले ही गावातील जलक्रांती पाहुन ग्रामस्थांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आणि आपले गाव पाणीदार झाल्याचा विश्वास बळावला. याकरीता उद्योजक तानाजी किणकर,आबासाहेब मुळे,राजेंद्र मुळे,सरपंच बाबासाहेब व्यवहारे, मानसिंग देशमुख,अविनाश देशमुख यांचे सहकार्य लाभले.

पिकाचे नियोजन करा...
गावाने एकत्र येत जलसंधारणाचे कामे केली त्याचा परीणाम आज होताना दिसत आहे अडविलेले पाण्याचे नियोजन करण्यासाठी गावाने एकत्र येत खरीप आणि रब्बी पिके कोणती घ्यायची याचे नियोजन करावे याकरीता गट शेतीचा पर्याय अवलंबावा तरच या कामांचा उपयोग होईल.
- पोपट पवार - (कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com