शिवराज्यभिषेक सोहळ्याला लाखो शिवशभक्त सहभागी होणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

भागवत देवसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती; शिवराज्यभिषेक सोहळा सहा जूनला

नांदेड: अखिल भारतीय शिवराज्यभिषेक सोहळा समितीच्या वतीने सहा जून रोजी विविध उपक्रमाने शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. देशभरातील नागरीकांनी हा दिमाखदार सोहळा बघावा यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून, भारतातून सुमारे दोन लाखापेक्षा जास्त शिवभक्त या सोहळ्यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे सद्‍स्य भागवत देवसरकर यांनी आज (मंगळवार) शासकीय विश्रामग्रहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

या वेळी मराठा सेवा संघाचे प्रा. संतोष देवराये, नानाराव कल्याणकर, उद्धव पाटील सुर्यवंशी, सतीश पाटील, रमेश पवार, धनंजय पाटील, संदीप पावडे, अवधूत पवार, मंगेश कदम यांची उपस्थिती होती. या वेळी अधिक माहिती देताना देवसरकर म्हणाले, 'पाच आणि सहा जून असा दोन दिवस चालणाऱ्या या शिवराज्यभिषेक सोहळ्यात युवराज छत्रपती संभाजी महाराज हे गडावर पायी चालत येणार असून, गडावर आलेल्या अनुयायींना मार्गदर्शन करणार आहेत. शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शिवाजी महाराजांच्या काळातील युद्धसाहित्य दाखविण्यात येणार असून, साहसी योद्धाकडून त्याचे प्रत्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. या शिवाय महाराष्ट्राची शाहिरी परंपरा जपण्याच्या हेतूनी शाहिरी कार्यक्रमाचे आयोजन तसेच संवर्धन रायगडाचे संवाद शिवभक्ताचा हा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून रोजी मुख्य कार्यक्रम होणार असून, या शिवराज्यभिषेक सोहळा होणार आहे. या वेळी दोन लाखापेक्षा जास्त शिवभक्त सोहळ्यात सहभागी होतील. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत भगवा ध्वज फडकावून शिवराज्यभिषेक सोहळ्याची सुरुवात करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्णनाण्याचा अभिषेक करण्यात येणार आहे.'

यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवराज्यअभिषेक कार्यक्रमास मोठ्या संख्येनी उपस्थित राहून, शिवभक्तांनी कर्यक्रमाची शोभा वाढवावी, असे अवाहान समितीच्या वतीने कऱण्यात आले आहे.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :