वाळव्यात राष्ट्रवादीला उमेदवाराचा शोध 

महादेव अहिर - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 जानेवारी 2017

वाळवा - जिल्हा परिषदेच्या वाळवा मतदारसंघात पारंपरिक सत्ताधारी हुतात्मा गटाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादीने हुतात्मा गटाचा पराभव केला होता. यावेळी मात्र "हुतात्मा'च्या उमेदवारीवर राष्ट्रवादीची रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी विरोधातील सर्वपक्षीय विकास आघाडीत हुतात्मा गट सहभागी झाला आहे. सध्या तरी हुतात्मा गटाकडून प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, उपसरपंच अपर्णा साळुंखे व कांचन वसंत वाजे यांच्या नावाची चर्चा आहे.

वाळवा - जिल्हा परिषदेच्या वाळवा मतदारसंघात पारंपरिक सत्ताधारी हुतात्मा गटाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या मतदारसंघात गतवेळी राष्ट्रवादीने हुतात्मा गटाचा पराभव केला होता. यावेळी मात्र "हुतात्मा'च्या उमेदवारीवर राष्ट्रवादीची रणनीती ठरणार आहे. राष्ट्रवादी विरोधातील सर्वपक्षीय विकास आघाडीत हुतात्मा गट सहभागी झाला आहे. सध्या तरी हुतात्मा गटाकडून प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, उपसरपंच अपर्णा साळुंखे व कांचन वसंत वाजे यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून पंचायत समिती सदस्या तपश्‍चर्या पाटील, मनीषा विकास अहिर, सायली गोंदील यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. 

हुतात्मा गटाकडून प्राचार्य नायकवडी यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीला त्या तोलामोलाचा उमेदवार शोधण्यासाठी कंबर कसावी लागेल. 

मतदारसंघ पुनर्रचनेमुळे जिल्हा परिषदेचा वाळवा मतदारसंघ "हुतात्मा'साठी पुन्हा सुरक्षित झाला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतांशी गावे या मतदारसंघात पुन्हा समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे. प्राचार्य नायकवडी व सौ. नायकवडी यांच्या निमित्ताने यावेळी एकाच कुटुंबातील दोन इच्छुक समोर आले आहेत. सौ. साळुंखे यांची पक्षनिष्ठा फळाला येते की काय? शिवाय सौ. वाजे यांना ऐनवेळी संधी मिळणार की काय? अशा चर्चा आहेत. 

पंचायत समितीच्या वाळवा मतदारसंघातून हुतात्मातर्फे नजीर वलांडकर यांच्या नावाची चर्चा आहे, तर राष्ट्रवादीतर्फे नेताजी पाटील, रवींद्र चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र जिल्हा परिषदेला सौ. तपश्‍चर्या पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास श्री. पाटील यांच्याऐवजी श्री. चव्हाण यांना उमेदवारीची शक्‍यता आहे. मात्र त्याऐवजी राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या उमेदवारीसाठी काहींचा आग्रह आहे. पडवळवाडी पंचायत समिती मतदारसंघातून गाताडवाडीचे सरपंच वैशाली जाधव यांचे नाव हुतात्मा गटाकडून, तर तुजारपूरच्या सौ. विजयश्री पाटील यांचे नाव राष्ट्रवादीतर्फे चर्चेत आहे. या मतदारसंघात हुतात्मा गटाचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेसाठी खुल्या गटातील महिलेचे आरक्षण आहे. 

बावची गाव वगळले 
मतदारसंघात राष्ट्रवादीचा एक अपवाद वगळता बहुतेक सत्ता हुतात्मा गटाची राहिली आहे. गतवेळी बावचीचा समावेश असल्यामुळे राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. आता बावची वगळून कार्यक्षेत्रातील गावांचा समावेश झाल्यामुळे सत्तेचा लंबक हुतात्मा गटाकडेच झुकण्याची चिन्हे आहेत. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस तोडीस तोड उमेदवार देण्याच्या प्रयत्नात आहे.

Web Title: NCP candidate search in walva