मोहोळ तालुक्यात संघटनात्मक धोरणासंदर्भात रा. काँग्रेसची बैठक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मोहोळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज (दि. 30) कुरुल येथे संघटनात्मक धोरण ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती.

मोहोळ - तालुक्यातील कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून काम करतात आणि हीच आमची खरी ताकद आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत जायचे की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल असे सांगत तालुक्याचा आमदार कोणी कितीही वलग्ना केल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय होईल. यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन लोकनेते शुगरचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केले. 

मोहोळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज (दि. 30) कुरुल येथे संघटनात्मक धोरण ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दुध संघाचे माजी संचालक सज्जन पाटील होते. याप्रसंगी दूध संघाचे संचालक दीपक माळी, जि प सदस्य शिवाजी सोनवणे, प स सदस्य माऊली चव्हाण   भारत सुतकर, हरिभाऊ आवताडे, भारत गायकवाड, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष धनाजी गावडे, लोकनेतेचे संचालक संदीप पवार, महिलाआघाडी अध्यक्ष सिंधुताई वाघमारे, रत्नमाला पोतदार , दिलीप पाटील, शशिकांत पाटील, राहुल क्षीरसागर, कुरुलचे सरपंच जनार्दन ननवरे, उपसरपंच दत्तात्रय जाधव, शत्रुघ्न जाधव, संभाजी चव्हाण, गोपाळ शेळके, कैलास माळगे, कालिदास गावडे, प्रशांत बचुटे आदी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले, तालुक्यातील सगळे पक्ष एकीकडे असताना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला वीस हजार मते अधिक मिळाली आहेत. आम्ही विकासावर बोलतो आणि विरोधक वैयक्तिक टीका करतात. मिळालेल्या पदाने हुरळून जाण्यापेक्षा आपल्या कामात लक्ष द्या. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अडवणूक होत असेल तर ती सहन केली जाणार नाही. कार्यकर्त्यांनी आता संघर्षाची तयारी ठेवावी गाफील न राहता लोकांची कामे करा. वातावरण अनुकूल आहे. राष्ट्रवादी पक्षाचा आमदार करण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी एक बूथ, पंधरा युथ ही संकल्पना आपण तालुक्यात राबविणार असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले. सर्व कार्यकर्त्यांनी त्याचे तंतोतंत पालन केले तर मोठे यश मिळेल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राजकीय सुडबुद्धीने बरखास्त केल्याबद्दल दोन मिनिटे उभा राहून भाजपा सरकारचा निषेध व धिक्कार करण्यात आला.
 
यावेळी जालिंदर लांडे, महेश पवार, शिवाजी सोनवणे, धनाजी गावडे, बालाजी लोहकरे आदींची भाषणे झाली. यावेळी पोपट जाधव, नागराज पाटील, शिवराज पाटील, विकास पवार, विष्णू जाधव, भारत जाधव, रवी देशमुख, संतोष पाटील, संतोष सावंत, राजकुमार पाटील, सचिन पवार आदींसह तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांनी मानले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: NCP meeting in mohol for organizational policy