माजी गृहमंत्र्यांच्या पत्नीवर दुर्दैवी वेळ - अजित पवार 

In the NCPs Hallabol Agitation Ajit Pawar Criticized to Government
In the NCPs Hallabol Agitation Ajit Pawar Criticized to Government

आटपाडी - तासगावातील भाजप व राष्ट्रवादीत झालेल्या राड्याचा संदर्भ घेत माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी गृहखात्यावर तोफ डागली. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आमदार पत्नीवर उपोषणाची वेळ आली आहे. तेथे सर्वसामान्यांची कोण दाद घेणार? अशा शब्दात त्यांनी गृहखात्याचे वाभाडे काढले. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनास आज आटपाडीतून प्रारंभ झाला. 

राष्ट्रवादीच्या या हल्लाबोल यात्रेच्या पार्श्‍वभूमीवरच तासगावात भाजपने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांवरही हल्ला केला. यासाठी आज तासगाव बंद होते. तर आमदार सुमन पाटील यांनी खासदारांवर कारावाई करावी यासाठी धरणे आंदोलन केले आहे. या सर्व प्रकरणाच्या छायेतच राष्ट्रवादीच्या हल्लाबोलला प्रारंभ झाला. 

श्री. पवार म्हणाले, 'केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर सर्वात मोठा अन्याय केला जात आहे. आजचे मंत्रालय आत्महत्यालय झाले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्‍यात आली आहे. आधारभूत किंमत, वर्षाला दोन लाख नोकऱ्या, पंधरा लाख खात्यावर जमा करणार, आरक्षण यापैकी एकही शब्द सरकारने पाळला नाही', अशा शब्दात त्यांनी तोफ डागली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, अण्णासाहेब डांगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आदी उपस्थित होते. रणरणत्या उन्हात झालेल्या या सभेला आटपाडीत चांगला प्रतिसाद मिळाला. शेतकरी, तरूण आणि महीलांची लक्षणीय उपस्थिती होती. 

श्री. पवार म्हणाले, 'भाजपकडून पश्‍चिम महाराष्ट्रावर सर्वात मोठा अन्याय झाला आहे. कृषीमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांना मोठी मदत केली. मात्र आताचे कृषीमंत्री कोण ते जनतेला माहितही नाहीत. राष्ट्रवादी जातीपातीचे आणि नात्यागोत्याचं राजकारण करीत नाही आमची जातच शेतकरी आहे.' 

भाजपचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठवताना ते म्हणाले, '32 रूपये किलोने साखर घेण्याचे पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले, मात्र एक किलोही घेतली नाही. तुरघोटाळा केला. उंदीर घोटाळा, चहा घोटाळाही केला. लोकमंगलमध्ये सापडलेल्या 500, 1000 च्या नोटा कोणाच्या होत्या? असा सवाल करत सोलापुरात फायरबिग्रेडच्या जागेवर घर बांधले आहे.' 

प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, 'कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मात्र 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत हल्लाबोल सुरू राहणार आहे. सरकारच्या धोरणामुळे डाळिंब, द्राक्ष आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला आहे. खोटं पण रेटून बोलणारे हे सरकार आहे. साडेतीन वर्षात जनतेच्या खात्यात पंधरा लाख नव्हे एक पैसाही जमा झाला नाही.'

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com