महिलांना घरगुती व्यवसायासाठी निता कुंभार ठरल्या आदर्श

neeta kumbhar is a ideal for women in domestic business
neeta kumbhar is a ideal for women in domestic business

कऱ्हाड - बचत गटाच्या माध्यमातून कुरवड्या, पापड, लोणची एवढ्यावरच न थांबता लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोषक असलेले काहीतरी वेगळं करण्याच्या जिद्दीने तळबीड (ता. कऱ्हाड) येथील निता संभाजी कुंभार यांनी स्वयंपाकासाठीची मातीची भांडी तयार करण्यास सुरवात केली. भांडी विक्रीसाठी त्याला वैष्णवी महिला स्वयंसहाय्यता गटाची जोड दिल्याने अल्पावधीच नावारुपास आलेल्या या व्यवसायामुळे त्यांच्या भांड्यांना राज्यातूनही मोठी मागणी होवु लागली आहे. 

बाजारात जे विकतयं आणि ज्याला मागणी आहे ती दिल्यास ते विकतं हे निता कुंभार यांनी स्वःनिर्मीतीतून दाखवुन दिले आहे. पहिल्या टप्यात त्यांनी पती व कुटुंबीयांच्या सहकार्यातून संक्राती, मडकी, मातीच्या मुर्ती तयार केल्या. मात्र त्याला जेमतेमच मागणी व्हायची. त्यावरच न थांबता आणि बचत गटाच्या कुरवड्या, पापड, लोणची निर्मीतीतच न रमता निताताईंनी जिद्दीच्या जोरावर कष्टाला साद घालत मातीची भांडी तयार करण्याचा निर्धार केला. त्यासाठी पैशांची अडचण होती. ती सोडवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यादरम्यान त्यांना महिलांचा बचत गट सुरु करण्याची कल्पना सुचली. त्यासाठी त्यांना कऱ्हाड पंचायत समितीतील महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका समन्वयक निलेश पवार व विस्तार अधिकारी एस. बी. पवार यांनी सहकार्य केले. त्यांनी वैष्णवी महिला स्वयंसाहय्यता गटाची स्थापना केली. त्यानंतर त्यांना व्यवसायासाठी पंतप्रधान रोजगार अंतर्गत खादी ग्रामोद्योग मंडळाने तीन लाखांची कर्ज स्वरुपात मदत केल्याने त्यांनी जिद्दीने व्यवसायात लक्ष घालुन स्वयंपाकासाठी लागणारी मातीची भांडी तयार कऱण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बाजारपेठेचा आणि मातीची भांडी कशी तयार करायची याचा अगोदर अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी मातीची विविध प्रकारची टिकावु आणि आरोग्यदायी स्वयंपाकाची भांडी तयार करण्यास पती संभाजी कुंभार व कुटुंबीयांच्या मदतीने 16 वर्षापुर्वी सुरवात केली. त्यावेळी जुनी लोप पावलेली स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरण्याची संकल्पना सध्याच्या काळातील लोकांच्या मनात उतरवताना मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे त्याला मागणी कमी होत होती. मात्र मातीच्या भांड्याच्या वापराबाबत लोकांमध्ये विविध पातळ्यांवर जागृती करण्यास प्रारंभ झाल्याने आणि मातीच्या भांड्यात भाजी-आमटी व अन्य पदार्थ केल्यामुळे लोह, मॅग्नेशीयम व अन्य खनीजे आपोआप मिळतात आणि त्यातील जेवणाला एक वेगळीच चव असते हे लक्षात येवु लागल्याने लोकांकडूनही या भाड्यांना मागणी वाढली आहे. त्यांनी गेल्या 16 वर्षात सुमारे दहा लाखांवर व्यवसाय केला आहे. त्यांनी जिल्हा परिषदेचे माणीनी जत्रा, माणदेशी प्रदर्शन, नक्षत्र प्रदर्शन, ज्योतिर्मय प्रदर्शन यासह कोल्हापुर, पुणे, सांगली, इस्लामपुर येथील शासनाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या प्रदर्शनात भाग घेवुन तेथेही मातीची भांडी पोचवली आहेत.  

नेत्यांनाही भांड्यांची भुरळ 
निताताईंच्या मातीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांची नेत्यांनाही भुरळ पडली आहे. त्यांची भांडी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या नेत्यांसह पाटणचे अमरसिंह पाटणकर, माणदेशीच्या चेतना सिन्हा, अर्बन बॅँकेचे अध्यक्ष डाॅ. सुभाष एरम यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व डाॅक्टरांनी मोठ्या प्रमाणात भांडी वापरासाठी नेल्याचेही सौ. कुभार यांनी सांगितले. 

त्या म्हणाल्या, 'एक महिला व्यवसायासाठी पुढे आल्यावर आणि तिला आर्थिक पाठबळ दिल्यावर ती स्वतःच्या पायावर कुटुंब उभे करु शकते हे मी माझ्या व्यवसायातून वैष्णवी महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून सिध्द करुन दाखवले आहे. त्यासाठी मला जिल्हा परिषद, पंचायत समिती, खादी ग्रामोद्योग मंडळाने मोलाची मदत केली. महिलांनी अजुनही बाजारात जे विकतयं ते तयार केल्यास चांगला व्यवसाय होऊन यश निश्चीतच मिळते. त्यासाठी महिलांनी एक पाऊल पुढे यायला हवं.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com