नेवासे कारागृहाची भिंत फोडण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

तीन जणांविरुद्ध गुन्हा; पहाऱ्यावरील पोलिसामुळे प्रकार उघडकीस
नेवासे - लोखंडी पट्टीने कारागृहाची भिंत फोडण्याचा प्रयत्न शुक्रवारी (ता.23) रात्री झाला. पहाऱ्यावर असलेल्या हवालदार काकडे यांच्या हे लक्षात आल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी कारागृहातील तीन आरोपींविरुद्ध आज गुन्हा दाखल केला.

अमर दत्तू पवार, मयूर अश्रूबा आव्हाड, संदीप बाळासाहेब लवांडे अशी आरोपींची नावे आहेत. बलात्कार, जबरी घरफोडी, हाणामाऱ्या या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी व उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांनी सकाळी कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. तहसील कार्यालयातील कर्मचारी संतोष लहारे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कारागृहाची लोखंडी पट्टी तोडून तिने मागच्या बाजूची भिंत फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथून पळून जाण्याचा आरोपींचा हेतू होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तातडीने दुरुस्ती आवश्‍यक
कारागृह अतिशय जुने असल्याने त्याच्या दरवाजाच्या पट्ट्या व भिंती कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे नवीन इमारत बांधणे किंवा तातडीने दुरुस्त्या करून मजबुती करणे गरजेचे आहे. पोलिस ठाण्याच्या मूल्यांकनासाठी आलेल्या त्रिपाठी यांनी त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.