बसची धडक बसून दोन वारकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

नेवासे - आराम बसची धडक बसून चाळीसगावचे दोन वारकरी मृत्युमुखी पडले. प्रवरासंगम येथे बुधवारी पहाटे हा अपघात घडला. दौलत पाटील (वय 82) व मांगू पाटील (वय 59, दोघे रा. चाळीसगाव) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पंढरपूरला निघालेल्या चाळीसगावच्या दिंडीचा काल रात्री प्रवरासंगम येथे मुक्काम होता. हे दोघे वारकरी पहाटे पाचच्या सुमारास प्रातःर्विधीसाठी जात होते. महामार्ग ओलांडताना त्यांना औरंगाबादकडे जाणाऱ्या आराम बसची धडक बसली. किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.