विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीसाठी ऑनलाइन टेंडर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचलनालयाने नवीन टर्मिनल इमारत व संबंधित कामासाठी 19 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन ई-टेंडर मागवल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर विमानतळ एन्व्हायर्मेंट इम्पॅक्‍ट असेसमेंटसाठी एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने विमानतळ बांधणी, विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण प्रक्रियेची निविदा काढून कोल्हापूरकरांना दिवाळी भेट यापूर्वीच दिली आहे. विमानतळ विस्तारीकरण आणि इतर बाबींसाठी 5691 लाखांची दुसरी निविदा प्रसिद्ध झाली. नवीन टर्मिनल इमारत, एटीसी, टॉवर कम तांत्रिक ब्लॉक कम फायर स्टेशन, आरईएसए, टॅक्‍सी वे, टॉवर सेट धावपट्टी, अलग बे विस्तार आणि संबंधित कामांचा समावेश त्यात आहे. भविष्यात विमानतळावर होणारी अपेक्षित गर्दी, आणि विमानतळाच्या भविष्यातील होणाऱ्या विस्ताराचा विचार करून या सुविधा करण्यात येणार आहेत. चार महिन्यांच्या कालावधीत कामाचे नियोजन, आराखडा, डिझाइन करणे आवश्‍यक असून या कामांची अंमलबजावणी करण्यासाठी आकस्मिक अनपेक्षित विलंब धरून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.