मिरजेतील "नव'भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

मिरज : महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले 13 आजी-माजी नगरसेवकांनी आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईतील शासकीय निवासस्थानी कार्यालयात आज जाहीर प्रवेश केला. गेले काही दिवस सुरु असलेल्या पक्षप्रवेशाचा अध्याय अखेर पुर्ण झाला. 

मिरज : महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले 13 आजी-माजी नगरसेवकांनी आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईतील शासकीय निवासस्थानी कार्यालयात आज जाहीर प्रवेश केला. गेले काही दिवस सुरु असलेल्या पक्षप्रवेशाचा अध्याय अखेर पुर्ण झाला. 

नव्याने प्रवेश केलेल्यांमध्ये माजी महापौर व कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक विवेक कांबळे, सुरेश आवटी, त्यांचे चिरंजीव नगरसेवक निरंजन आवटी, संदीप आवटी, नगरसेवक शिवाजी दुर्वे, माजी नगरसेवक आनंदा देवमाने, महादेव कुरणे, जनता दलाचे विठ्ठल खोत, "मनसे' चे दिगंबर जाधव, शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे, उद्योजक गणेश माळी, भीमराव बुधनाळे, महेंद्र पाटील (कुपवाड) आणि अमोल सूर्यवंशी, नितिन आवटी, डॉ पंकज म्हेत्रे, अभिजित कुरणे, विनायक शेरबंदे, रमेश मेंढे, विनायक रुईकर, भैय्या सुर्यवंशी, बाळू अस्वले यांच्यासह अन्य वजनदार कार्यकर्त्यांचाही यात समावेश आहे. महापालिकेच्या येत्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांना अधिकृत पक्षप्रवेश केल्याशिवाय उमेदवारी द्यायची नाही, अशी भूमिका आमदार सुरेश खाडे यांनी घेतली. परिणामी "मिरज पॅटर्न' मधील इच्छुक कोंडीत सापडले. त्यापैकी काहींनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले. 

चार विद्यमान नगरसेवकांनी पक्ष प्रवेश केला असून त्यात कॉंग्रेसचे माजी महापौर व रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राज्य उपाध्यक्ष विवेक कांबळे यांचा समावेश आहे. याशिवाय स्वाभीमानी आघाडीच्या नगरसेवक शांता जाधव यांचे चिरंजीव मनसेचे शहराध्यक्ष दिगंबर जाधव, स्वाभीमानीच्या अन्य एक नगरसेवक संगीता खोत यांची पती व जनता दलाचे ज्येष्ठ कार्यकते विठ्ठल खोत यांचाही समावेश आहे. ही सर्व मंडळी सध्या मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी थांबले आहेत. त्यांना भेटून ते मिरजेकडे येणार आहेत. 

मिरजेत जाहीर सभा 
दरम्यान भाजपच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत पक्षप्रवेशाचा नियोजन होते. तथापि राज्य कार्यकारणीची सांगलीतील बैठक कृषीमंत्री पाडुंरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रद्द झाल्याने हा पक्ष प्रवेश तातडीने करण्यात आला. तथापि सांगलीत भव्य मेळावा होऊन जाहीर सभा होईल. या सभेसाठी राज्यस्तरीय नेते उपस्थित राहतील असे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनी सांगितले. 

Web Title: new enter corporators of bjp will meets chief minister