शिवरायांच्या पुतळ्याजवळ नवी तलवार बसवणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

महाड : रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ नवी तलवार बसवली जाणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली. तलवारीचे टोक तुटले आहे. मात्र, या घटनेला विटंबनेचे स्वरूप देऊ नये. अनवधानानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.

महाड : रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ नवी तलवार बसवली जाणार आहे, अशी माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली. तलवारीचे टोक तुटले आहे. मात्र, या घटनेला विटंबनेचे स्वरूप देऊ नये. अनवधानानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवरायांच्या पुतळ्याच्या तलवारीचे टोक तुटल्याचे शनिवारी (ता. 10) सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. गडावर सध्या पर्यटक व शालेय सहलींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनवधानाने हा प्रकार घडला असावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. रविवारी सकाळी छत्रपती संभाजी राजे, महाडचे आमदार भरत गोगावले, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय पाटील, तहसीलदार औदुंबर पाटील, पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. तलवारीचे टोक तुटण्याची घटना अनवधानाने घडली आहे, जाणूनबुजून कोणी हे कृत्य केलेले नाही, त्यामुळे या घटनेला वेगळे स्वरूप न देता शिवप्रेमींनी संयम राखावा. सोशल मीडियावर चुकीचे संदेश पाठवताना भान असावे, असे आवाहन या वेळी संभाजी राजे यांनी केले. शिवरायांचा पुतळा साकारणाऱ्या कोल्हापूर येथील शिल्पकाराकडूनच नवीन तलवार बनवली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. रायगडावर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवावी, अशी मागणी या वेळी आमदार गोगावले यांनी केली.

मेघडंबरीला सुरक्षा
रायगड किल्ला व परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्‍वानपथकही तैनात आहे. तलवारीच्या तुटलेल्या टोकाचा शोध घेण्यासाठी मेटल डिटेक्‍टरचा वापर करण्यात आला. गडावर पर्यटकांची वर्दळ असल्याने मेघडंबरी परिसर बांबूच्या साह्याने बंद करण्यात आला आहे. तेथे प्रवेशास बंदी करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील वेणूबाई जालिंदर कोटकर ( वय ५० ) या महिलेचा स्वाईन फ्लू आजाराने मंगळवारी...

11.57 AM

कऱ्हाड : तालुक्यातील साबळवाडी येथे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या गाव विहीरीत कासव मृत अवस्थेत आढळले. ते कासव अठरा नख्यांचे आहे....

11.27 AM

निघोज : जवळा( ता पारनेर )येथे येथील जिल्हा सहकारी बँकेची शाखा (बुधवारी) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु...

11.24 AM