नाशिकची कंपनीच पाडणार 'सिद्धेश्‍वर'ची चिमणी'

नाशिकची कंपनीच पाडणार 'सिद्धेश्‍वर'ची चिमणी'

सोलापूर- येथील सिद्धेश्‍वर सहकारी कारखान्याची चिमणी नाशिक येथील विहान कंपनीच पाडणार आहे. चिमणी पाडण्याचे नियोजन करण्यासाठी आज (मंगळवारी) बैठक होणार आहे. 

सोलापूर विमानतळावरून विमान सेवा करण्यास सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत आहे. त्यामुळे राज्य शासनानेच ही चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिमणी पाडण्याचे आदेश दिले. मात्र, त्याची कार्यवाही झाली नव्हती. दरम्यान, हेलिपॅडच्या परिसरात उभारलेल्या खांबाला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा पंखा लागल्याने निलंग्यात मे 2017 च्या शेवटच्या आठवड्यात दुर्घटना झाली. त्यानंतर पालिकेने चिमणी पाडण्यासाठी तातडीने निविदा काढली होती. पहिल्या तीन वेळेस कुणीही निविदा दाखल केली नव्हती. चौथ्यांदा नाशिक येथील कंपनीने निविदा दाखल केली होती. 

परवानगी न घेता ही चिमणी उभारल्याने ती पाडून घेण्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे ती पाडून घेण्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. मात्र त्यानुसार कार्यवाही न झाल्याने शासनानेच चिमणी पाडण्याचे आदेश दिले. ही चिमणी एम. एस. स्टील व कॉँक्रीट वापरून मिश्र पद्धतीने बांधण्यात आली आहे. ती पाडण्यासाठी जो खर्च येईल, तो शासन देणार आहे, असे सचिवांनी महापालिकेस कळविले आहे. दरम्यान, न्यायालयाने चिमणी पाडकामास स्थगिती दिल्याने कारवाई थांबली होती.

काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने या संदर्भात नव्याने आदेश दिले व चिमणी तातडीने पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी चिमणी पाडण्याची कारवाई तातडीने करण्याचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले. गेल्या शनिवारी (ता.15) आयुक्त मुंबईला गेल्याने नियोजन झाले नव्हते. आता या संदर्भात प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू असून, कोणत्याही स्थितीत चिमणी पाडण्याची कार्यवाही करावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com