निळवंडे पाटपाणी कृतिसमितीची दिल्ली भेट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पोहेगाव( नगर) : खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे पाटपाणी कृतिसमितीच्या एका शिष्टमंडळाने काल (सोमवार) केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन एस. मसूद हुसैन, तसेच तांत्रिक सल्लागार समितीचे संचालक सी. के. एल. दास व केंद्रीय जल आयोगाचे संचालक नित्यानंद मुखर्जी यांची भेट घेतली. येत्या 8 जूनच्या बैठकीत निळवंडेचा विषय घेऊन त्याला मान्यता देण्याचे आश्वासन हुसैन यांनी दिले. 
या वेळी निळवंडे प्रकल्पाला लवकरात लवकर तांत्रिक सल्लागार समितीची मंजुरी देण्याची विनंती शिष्टमंडळाने केली.

शिष्टमंडळासमोरच हुसैन यांनी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन या प्रकल्पाची सर्व माहिती जाणून घेतली. येत्या बैठकीसाठी आवश्‍यक असलेली तांत्रिक सल्लागार समितीची टिपणी निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रमेश बागूल यांनी 23 मे 2018 रोजी केंद्रीय जल आयोगाला सादर केली. त्यानंतर लगेचच त्याचा पाठपुरावा करण्यासाठी निळवंडे पाटपाणी कृतिसमितीने नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी आणि संचालक मंडळाची भेट घेऊन यशस्वी चर्चा केली.

बळिराजा कृषी संजीवनी योजनेत निळवंडेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता हा निधी मिळण्यासाठी प्रमुख अडथळा होता. 
या शिष्टमंडळात निळवंडे पाटपाणी कृतिसमितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, गंगाधर गमे, नानासाहेब शेळके, उत्तम घोरपडे, सुखलाल गांगवे, राजेंद्र सोनवणे, दादासाहेब पवार यांचा समावेश होता. याचबरोबर निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रमेश बागूल व उपअभियंता विवेक लव्हाट हेदेखील उपस्थित होते. 

"केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांशी झालेली बैठक ही सकारात्मक झाली. बैठकीत टीएसी संदर्भातील सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. 8 जूनच्या बैठकीत तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळणार आहे.'' 
-सदाशिव लोखंडे, खासदार, शिर्डी. 

Web Title: nilvande patangani Kriti Samiti Visit to delhi