राज्य सरकार स्थिर आहे : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

बेळगाव सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. कर्नाटक सरकारने चालविलेली दडपशाही म्हणजे लोकशाहीची हत्याच आहे. या प्रश्‍नी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

कोल्हापूर : नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवरून शिवसेना केंद्र सरकारवर टीका करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सरकार आता पूर्ण स्थिर आहे' असे आज (बुधवार) स्पष्ट केले. नगरपालिकांमधील प्रचार दौऱ्यासाठी मुख्यमंत्री काल इचलकरंजीमध्ये होते. त्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यात विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. यातील बहुसंख्य प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होतील आणि त्याचे परिणामही आपल्याला दिसू लागतील. शेती क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. शेतीतील उत्पादकता वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. उसाव्यतिरिक्त अन्य पिकांच्या बाबतीतही राज्याला अधिक सक्षम बनविण्यासाठी ठोस पावले आम्ही उचलत आहोत. शाश्‍वत शेतीसाठी गुंतवणूक वाढविण्यावर आता भर राहील.''

नोटाबंदीच्या निर्णयावरून शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारचे कौतुक आणि टीका अशा दोन्ही गोष्टी केल्या आहेत. पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने देशभरात बॅंका आणि एटीएमसमोर खातेदारांच्या रांगा लागत आहेत. याविषयीही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 'लोकांना या निर्णयामुळे त्रास होत आहे, हे खरेच आहे. पण ते सहन करत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकांवर सकारात्मक परिणाम होईल,' असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकांमधील संभाव्य युतीविषयीही त्यांनी भाष्य केले. स्थानिक निवडणुकीचे निर्णय स्थानिक पातळीवरच घेतले जातात. 1995 मध्ये युती सरकार असतानाही स्थानिक पातळीवरच निर्णय घेतले गेले होते.

जुन्या नोटा बदलून देण्याविषयी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांवर निर्बंध लादले आहेत. 'जिल्हा बॅंकांवर काही प्रमाणात निर्बंध घालून हे व्यवहार करण्यास परवानगी द्यावी, यासाठी प्रयत्न करत आहोत,' अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे, त्यातच ...

10.12 AM

कोल्हापूर - डॉल्बी सिस्टीमबाबत आजपर्यंत अनेकवेळा प्रबोधन होऊनसुद्धा पोलिसांना आव्हान देत मंडळांकडून त्याचा वापर केला जातो....

06.03 AM

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज प्रथमच खासदार राजू...

05.48 AM