तपासी अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

सातारा - संतोष पोळने खून केलेल्या व्यक्तींच्या बेपत्ता झालेल्या तक्रारींचा तपास करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.

सातारा - संतोष पोळने खून केलेल्या व्यक्तींच्या बेपत्ता झालेल्या तक्रारींचा तपास करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.

संतोष पोळने सुरेखा चिकणे यांचा 2003 मध्ये खून केला. या वेळी त्या बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल झाली होती. इतर चौघांच्या बेपत्ता झाल्याबाबतही तक्रारी पोलिस ठाण्यात नोंद त्या- त्या वेळी झाली आहे. या तक्रारींची चौकशी योग्य पद्धतीने न झाल्यामुळेच पोळचे धाडस वाढत गेले आणि एवढे मोठे खून सत्र घडले. त्यामुळे मृत बेपत्ता व्यक्तींचा तपास ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे होता, त्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिले आहेत. या तपासी अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकरणांमध्ये काय- काय तपास केला. कोठे त्रुटी राहिल्या याची पडताळणी केल्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

डोक्‍यावरचे ओझे कमी झाले
गेल्या दोन दिवसांमध्ये संतोष पोळने आपल्या कृष्ण कृत्यांचा पाढा पोलिसांसमोर वाचला. त्यानुसार आणखी चार जणांचे मृतदेह पोलिसांनी शोधून काढले. त्यासाठी काल दिवसभर पोळ वाई व धोममध्येच होता. रात्री त्याला साताऱ्यात आणण्यात आले. या वेळी "डोक्‍यावरचे मोठे ओझे कमी झाले, खूप उपद्‌व्याप केले होते. त्यामुळे सतत डोक्‍यात चक्र चालू असायचे. आज मी शांत झोपेन,‘ असे उत्तर थंड डोक्‍याच्या पोळने पोलिसांना दिले. केलेल्या कृत्यांच्या पश्‍चाताप मात्र त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.

इंजेक्‍शनच त्याचे शस्त्र
खुनासाठी इंजेक्‍शनचाच वापर का केला, असा प्रश्‍न पोलिसांनी त्याला तपासामध्ये विचारला. या वेळी इतर पद्धतीने खून करण्यासाठी जास्त माणसे लागली असती. जास्त साक्षीदार झाले असते. आरडाओरडाही झाला असता. शांतपणे काटा काढण्यासाठी इंजेक्‍शन हे प्रभावी शस्त्र होते. त्यामुळे त्याचाच वापर केला, असे त्याने पोलिसांना सांगितले.

इमोशनल केल्यानेच पोळ बोलता झाला
संतोष पोळ हा हुशार व अत्यंत थंड डोक्‍याचा आहे. कोणत्याही प्रकारच्या माराला किंवा शारीरिक त्रासाला तो बधणार नव्हता, हे पोलिसांनी जाणले होते. त्यामुळे प्रश्‍नांचा भडीमार करत पोलिस सतत त्याच्याशी बोलत होते. त्यातून त्याला भावनिक करण्याचा प्रयत्न पोलिस सातत्याने करत होते. एलसीबीचे निरीक्षक पद्‌माकर घनवट व त्यांची टीम त्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत होती. अखेरीस त्यांना यश आले आणि एक बोटही न लावता पोळने आपल्या काळ्या कृत्यांचा पाढा पोलिसांसमोर वाचला. त्यातही पोलिसांना गुमराह करण्याचा प्रयत्न तो करत होता; परंतु पोलिसांनी तपासाचे कसब पणाला लावून त्याच्याकडून नेमकी माहिती काढून घेण्यात यश मिळविले.

Web Title: Officials will investigate investigation

टॅग्स